बेस्ट फ्रेंडच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता फुटबॉलपटू मेस्सी; २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केले लग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिओनेल मेस्सीला फुटबॉल जगतातील एक महान दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. आपल्या कारकीर्दीत त्याने मैदानावर अनेक विक्रम केले आहेत, तसेच मैदानाबाहेरही तो बहुतेक वेळा वादांपासून दूरच राहिला आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मेस्सी हा एक असा खेळाडू आहे जो त्याच क्लबमध्ये आहे. इतका मोठा स्टार असूनही त्याची ही निष्ठाच त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. फुटबॉलप्रमाणेच, मेस्सी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील तितकाच निष्ठावान आहे, त्याच्या बालपणातील मैत्रिणीबरोबर मेस्सीने लग्न केले होते आणि या काळात त्याचे नाव इतर कोणत्याही मुलीशी कधीच जोडले गेले नव्हते.

मेस्सीची वयाच्या पाचव्या वर्षी अँटोनियाशी पहिल्यांदा भेट झाली
अँटोनिया नेरोक्कुझो ही मेस्सीचा सर्वात चांगला मित्र लुकास स्कॅगलियाची कझिन होती. मेस्सी बालपणीच लुकासच्या घरी पहिल्यांदा अँटोनियाला भेटला होता, तेव्हापासूनच त्याचे तिच्यावर प्रेम जडले. मात्र, फुटबॉलमुळे तो त्यांच्यापासून दूर गेला आणि काही काळानंतर जेव्हा तो आपल्या घरी परत आला, तेव्हा तो पुन्हा अँटोनियाला भेटला. मेस्सीने तेव्हा तिला आपल्या मनातील गोष्ट सांगितली आणि मग दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. जेव्हा मेस्सी स्पेनमध्ये राहू लागला आणि सुपरस्टार बनला, तेव्हा लोक त्याच्या गर्लफ्रेंडविषयी वारंवार विचारत असत. तेव्हा तो त्या प्रश्नांना टाळत असे.

Lionel Messi shares incredible throwback picture of him and wife ...

2009 मध्ये जाहीर केली आपल्या प्रेमाची गोष्ट
लिओनेल मेस्सीने आपली ही प्रेमाची गोष्ट बराच काळ जगाच्या नजरेतून लपवून ठेवली होती. 2009 मध्ये पेप गार्डिओलाच्या संघासाठी ‘यूईएफए चॅम्पियन्स लीग’ जिंकल्यानंतर,जेव्हा कॅटलान या वाहिनी ‘टीव्ही थ्री’ ने मेस्सीला ‘तुला प्रेमिका आहे का’ असे विचारले तेव्हा मेस्सी म्हणाला, ‘हो आहे, आणि ती अर्जेटिनामध्ये राहते’. मेसीने पहिल्यांदाच आपल्या प्रेमाबद्दल जाहीरपणे सांगितले. मेस्सीच्या जाहीर या कबुलीनंतर अँटोनिया बार्सिलोनाला गेली. ती मेस्सीबरोबरच राहू लागली.

मेस्सी लग्नाआधीच बनला होता बाप
2 जून, 2012 रोजी मेस्सीने इक्वाडोर विरूद्ध गोल नोंदवल्यानंतर जर्सीच्या आत फुटबॉल ठेवला. त्यावेळी तो जगाला सांगत होता की अँटोनिया गर्भवती आहे. घरी येणारी चांगली बातमी सांगणे ही मेस्सीची स्वतःची स्टाईल होती. आज मेस्सी थियॅगो, मट्टेओ आणि कैरो या तीन मुलांचा बाप आहे. अर्जेंटिना आणि बार्सिलोना या संघांच्या या स्टार फुटबॉलरने जून महिन्यात त्याच्या बालपणीची मैत्रीण आणि प्रेमिका अँटोनिया नेरोक्कुझो हिच्याशी लग्न केले. मेस्सीने आपल्या पत्नीसाठी त्याच्या शरीरावर एक विशेष टॅटू बनविला आहे. या टॅटूमध्ये लाल रंगाच्या ओठांचा आकार आहे.

जिथे प्रेमकहानी सुरू झाली तिथेच मेस्सी विवाहबंधनात अडकला
मेस्सीने अँटानियाशी त्यांच्या मूळ गावी रोजारियो येथे लग्न केले. जिथे त्याने त्याची प्रेमकथा सुरु झाली तिथेच त्याला लग्न करायचं होतं. मेस्सीच्या लग्नात त्याचे सहकारी साथीदार लुईस सुआरेझ, नेमार, जेरार्ड पिक आणि त्याची पत्नी शकीरा हजर होते. एक लहान शहर असल्याने प्रत्येकास खासगी विमानाने रोजारिया येथे आणले गेले. लग्नाच्या वेळी त्यांना दोन मुले होती आणि लग्नाआधीच ते दोघेही नऊ वर्षे एकत्र राहत होते.

Who is Antonella Roccuzzo? Everything you need to know about ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment