राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने दिलं पहिलं दान; दिली इतकी रक्कम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. यात ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असून त्यात दलित सदस्यही असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिर उभारण्याच्या दिशेने काम सुरु व्हावं यासाठी केंद्राकडून एका(१रु.) रुपयाचं दान करण्यात आलं. केंद्र सरकारकडून गृह मंत्रालयाचे अवर सचिव डी मुर्मू यांनी हे दान दिलं. अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, हे विश्वस्त मंडळ स्थावर मालमत्तेसह विनाअट कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही स्वरुपात दान, अनुदान, अंशदान आणि योगदान घेऊ शकणार आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण विश्वस्त मंडळात असतील. या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंदजी महाराज हे देखील सदस्य असणार आहेत. या व्यतिरिक्त पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांच्या नावांचा देखील समावेश आहे.

सुरुवातीला विश्वस्त मंडळाचे ज्येष्ठ अधिवक्ता के परासरण यांच्या निवासस्थानी कार्यालयाचं काम सुरु राहणार आहे. मात्र नंतर कायमस्वरुपी कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाकडे राम मंदिर निर्मिती तसंच याच्याशी संबंधित विषयांवर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असणार आहे. विश्वस्त मंडळाचे नोंदणीकृत कार्यालय दिल्लीत असणार आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment