कोरोनापासून मुक्त होण्यासाठी ‘या’ अभिनेत्याचा कापणार पाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सद्या जगभर कोरोना ने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगातील २३ लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यात आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता निक कॉर्डेरोला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. मात्र त्याला या आजारातून बरे होण्यासाठी त्याचा पाय गमवावा लागणार आहे. कारण यातून जर बरं व्हायचं असेल तर त्याला आपला पाय कापावा लागणार आहे. अस डॉक्टरांनी सांगितलं आहे.

निकची बायको अमांडा हिने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ती म्हणाली की “आज डॉक्टरांनी आम्हाला एक धक्कादायक बातमी दिली आहे. निकला कोरोना झाला आहे. तसच आता त्याच्या डाव्या पायातील रक्त गोठत आहे. सुरुवातीला डॉक्टरांनी रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं दिली. मात्र यामुळे त्याचा रक्तदाब वाढत आहे. शस्त्रक्रियेचा उपायही त्याच्यावर निकामी ठरला.

त्यामुळे शेवटी डॉक्टरांनी त्याचा डावा कापण्याचा निर्णय घेतला अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली. डॉक्टरांनी आम्हाला दोन पर्याय दिले होते. एकतर निकचा जीव किंवा त्याचा पाय आम्ही पहिला पर्याय स्विकारला. यापूर्वी देखील निकला असा त्रास होत होता, परंतु करोना विषाणूची लागण झाल्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी झाली.” असही तिने सांगितलं.