बदल घडवायचा असेल तर आता मशाल हाती घ्यावी लागेल- तुषार गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
बदल घडवायचा असेल तर आता मेणबत्ती पेटवून चालणार नाही तर मशाल हाती घ्यावी लागेल असं मत गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी व्यक्त केलय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जागर सभेत ते बोलत होते. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

पानसरे यांची हत्या होऊन पाच वर्षे झाली तरी आरोपी मोकाट आहेत हे आपल्यासाठी लांछन आहे. अराजकतेचा आपण मान्यता दिल्याचे प्रतीक असल्याचे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केल. देशाचा आत्मा बदलण्याचा प्रयत्न होतोय त्याला वेळीच रोखले पाहिजे अशी अपेक्षा देखील तुषार गांधींनी व्यक्त केलीय. बाकीचे दिवस गोडसे समर्थन करणाऱ्यांना दोनच दिवस बापूंची आठवण येते असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. दांडी यात्रेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती निमित्त आपण साबरमती होऊन दांडी यात्रा काढणार आहोत यासाठी कोणत्याही परवानगीची मला गरज नाही अस देखील ते म्हणालेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment