यंदाचा अर्थसंकल्प येणार डिजिटल पद्धतीने ; पहा काय बदल असणार या अर्थसंकल्पात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय. कोरोनाच्या संकटकाळात सादर होणारा हा अर्थसंकल्प असल्यानं तो अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असेल. पण त्यातही या बजेटला एक गोष्ट पहिल्यांदाच होणार आहे. हे देशाचं पहिलं पेपरलेस बजेट असेल.देशाचा अर्थसंकल्प म्हणजे अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज…पण यंदा या बजेटबाबत एक अभूतपूर्व गोष्ट घडणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होईल की बजेट छापलंच जाणार नाही. तर ते केवळ डिजीटल स्वरुपात उपलब्ध असेल. बजेटची साँफ्ट कॉपी खासदार आणि इतर संबंधितांना वाटली जाईल. कोरोनामुळे हा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा आहे.

पूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्पाची कागदपत्रे चामड्याच्या ब्रिफकेसमध्ये घेऊन जायचे. त्याच्या कॉपी सगळ्यांना मिळत होत्या. 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी ही संकल्पना खंडित केली आणि अर्थसंकल्पाची कागदपत्रे लाल रंगाच्या फाईलमध्ये नेली. यंदा तर अजूनच मोठा बदल केला आहे. यंदा पेपरलेस अर्थसंकल्प सादर होत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण लोकसभा वाहिनीवर केले जाणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभा वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरु होईल. त्याशिवाय अर्थ मंत्रालयाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर देखील याची अद्ययावत माहिती दिली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like