गेली अकरा वर्षे तो देशाची इमाने – इतबारे सेवा करतं होता; वाचा एका श्वानाच्या शाही निरोप समारंभाची स्टोरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेली अकरा वर्ष तो देशाची इमाने – इतबारे सेवा करत होता.तो फक्त नाशिक पोलिसांसाठी बॉम्ब शोधणारा “स्निपर स्पाईक डॉग” नव्हताच. तो होता एक सच्चा देशसेवक… त्याच्या निरोप समारंभाला सगळ्यांना गहिवरून आले. म्हणूनच त्याचा निरोप समारंभ अगदी शाही थाटात पार पडला. हे शब्द आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे. देशमुखांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डल वरून एका बॉम्ब शोधक श्वानाच्या निरोप समारंभाचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि त्या श्वानाला सलाम सुद्धा केलंय.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अक्षय कुमारचा “हॉलिडे सोलजर इज ऑफ ड्युटी” नावाचा चित्रपट बघितला असेल. त्या चित्रपटात असाच एक श्वान पायाला दुखापत होते म्हणून त्याला पोलीस प्रशासनातून निवृत्त होतो. आपल्या पोलीस मित्राला सांगून अक्षय कुमार त्या श्वानाला आपल्याघरी ठेऊन घेतो आणि त्या श्वानाच्या मदतीने “स्लीपर सेल” ( सामान्य लोकांमध्ये राहून अतिरेकी कारवाया करणारे) शोधून काढतो. तशीच आठवण येणारा हा श्वान गेली अकरा वर्ष नाशिक पोलिसांना त्यांच्यातलाच एक भाग बनून मदत करत होता. त्याच्या मदतीने कैक अतिरेक्यांना, गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलं असेल याचा अंदाज नाही. त्याच्या त्याच कार्याचं स्मरण म्हणून त्याचा निरोप समारंभ अगदी शाही थाटात केला गेला.

मुळात श्वानाचे “सेन्स ऑर्गन” हे मोठ्या प्रमाणार स्ट्राँग असतात. त्यामुळे फक्त विशिष्ट स्वरूपाची ट्रेनिंग एकदा जर त्याला दिली तर त्याच्या संपूर्ण आयुष्यभर तो श्वान त्याच पद्धतीत काम करू शकतो. पोलीस प्रशासनात खासकरून अगदी गुंता – गुंतीच्या प्रकरणात श्वानांचा वापर करून गुन्ह्याची उकल करता येते म्हणून पोलीस प्रशासनात खासकरून श्वानाची खुप गरज भासते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment