रिअल इस्टेट क्षेत्रातील परकीय गुंतवणुक $23.9 अब्ज पर्यंत वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मागील पाच वर्षांच्या तुलनेत 2017 ते 2021 या कालावधीत तीन पटीने वाढून $23.9 अब्ज झाली आहे. रिअल इस्टेट ऍडव्हायझर कंपनी कॉलियर्स आणि इंडस्ट्री बॉडी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली.

भारतीय रिअल इस्टेटमधील परकीय गुंतवणुकीवरील आपल्या रिपोर्टमध्ये कॉलियर्सने म्हटले आहे की, जागतिक गुंतवणूकदारांनी 2016 मध्ये नियामक सुधारणांमुळे देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “परकीय गुंतवणूकदारांनी 2017 पासून जास्त आशेने देशात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी भारतातील रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये पारदर्शकता नसल्याने परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक टाळायचे.

आकडेवारीनुसार, 2017 ते 2021 या कालावधीत देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील परकीय गुंतवणूक 2012 ते 2016 या कालावधीत 7.5 अब्ज डॉलरवरून $23.9 अब्ज झाली आहे. 2012 ते 2021 या कालावधीत भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण गुंतवणूक $49.4 अब्ज इतकी वाढली आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा 64 टक्के आहे.

याशिवाय, 2017-2021 या कालावधीत भारतीय रिअल इस्टेटमधील परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा 82 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मागील पाच वर्षांच्या कालावधीत 37 टक्के होता. ऍडव्हायझर कंपनीच्या म्हणण्यानुसार, 2017 पासून यूएस आणि कॅनडाच्या परदेशी गुंतवणुकीतील गुंतवणुकीचा वाटा दरवर्षी 60 टक्क्यांहून जास्त आहे.

Leave a Comment