विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेवरील आत्मविश्वास वाढला, नोव्हेंबरमध्ये FPI ने केली 19,712 कोटी रुपयांची गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIs ने नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत आतापर्यंत 19,712 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 1 ते 18 नोव्हेंबर दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये 14,051 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या दरम्यान त्यांनी लोन सेगमेंटमध्ये 5,661 कोटी रुपये ठेवले. अशाप्रकारे, या कालावधीत त्यांची एकूण 19,712 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

FPI गुंतवणूक मूल्य $667 अब्ज पर्यंत वाढले आहे
देशांतर्गत शेअर्समध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा हिस्सा मागील तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 13 टक्क्यांनी वाढून $667 अब्ज झाला आहे. मॉर्निंगस्टारने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, देशांतर्गत शेअर बाजारांच्या मजबूत कामगिरीमुळे या तिमाहीत स्टॉकमधील FPI चा हिस्सा वाढला आहे. “सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीच्या शेवटी भारतीय शेअर्समध्ये FPI गुंतवणुकीचे मूल्य $667 अब्ज झाले आहे, जे मागील तिमाहीतील $592 अब्ज पेक्षा 13 टक्क्यांनी वाढले आहे,” असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात FPIs ने भारतीय बाजारातून 949 कोटी रुपये काढले आहेत
महत्त्वाचे म्हणजे, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून 949 कोटी रुपये काढले होते. डिपॉझिटरी डेटानुसार, 1-12 नोव्हेंबर दरम्यान FPI ने इक्विटीमधून 4,694 कोटी रुपये काढले. त्याच वेळी त्यांनी डेट किंवा बॉण्ड मार्केटमध्ये 3,745 कोटी रुपये ठेवले. अशा प्रकारे त्यांची निव्वळ काढणी 949 कोटी रुपये झाली. ऑक्टोबरमध्ये FPIs ची निव्वळ विक्री 12,437 कोटी रुपये होती.