वनविभागाची कारवाई : चोरीच्या कोळसासह 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने काल रात्री दि. 11 रोजी कांबळेश्वर – खूंटे रोडवर मोजे कांबळेश्वर (ता.फलटण) गावचे हद्दीत अवैद्यरीत्या वाहतुक करीत असताना आढळून आल्याने ताब्यात घेवून जप्त केला आहे. वनविभागाने आयशर ट्रक सह 150 पोती कोळसा (वजन सुमारे 3500 किलो) इत्यादी सुमारे 6.50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातुन कोळसा भरून पुण्याला निघालेला आयशर ट्रक क्रमांक (MH-14-AS-9143) निघाला होता. अधिक चौकशीअंती सदरचा कोळसा हा अवैधरित्या चोरटी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी वनविभागाने आयशर ट्रक सह 150 पोती कोळसा (वजन सुमारे 3500 किलो) इत्यादी सुमारे 6.50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये वाहनचालक माऊली परमेश्वर लंगडे (वय- 23 वर्ष, रा. पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे) याचेविरूध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)(ब) नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई सातारचे भरारी पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, वनपाल दिपक गायकवाड, वनरक्षक विजय भोसले, वनरक्षक आनंद जगताप, राजेश वीरकर, पोलीस हवालदार सुहास पवार, चालक दिनेश नेहरकर यांनी केली .

Leave a Comment