Tuesday, February 7, 2023

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांस लाच घेताना अटक, मात्र पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने रक्कम अज्ञातस्थळी फेकली

- Advertisement -

सातारा | माण तालुक्यातील दहिवडी येथील वनविभाग कर्मचाऱ्यांस केलेल्या कामाचे चेक ठेकेदारांस काढून देण्यापोटी लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वन विभागातील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची लाच घेताना दहिवडी येथील वनपाल कार्यालयाजवळ पकडण्यात आले. दरम्यान, स्वीकारलेली लाचेची रक्कम मात्र मिळून आली नसल्याची माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.

- Advertisement -

वनपरिक्षेत्र अधिकारी, दहीवडी वन विभाग (ता. माण, जि. सातारा) येथील कर्मचारी सूर्यकांत पोळ याने शिंदी खुर्द येथील माती बंधान्याच्या कामाच्या बिलाचा चेक काढण्यासाठी पोट ठेकेदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथे तक्रार दिली. त्यानुसार २ जून रोजी एसीबीने सापळा लावला. संशयित आरोपीने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने ती लाच रक्कम अज्ञातस्थळी फेकून दिली. एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पैसे सापडले नाहीत. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.