Form 15G And 15H : बँकेत FD आहे? तर सगळ्यात आधी ‘हे’ फॉर्म भरा; नाहीतर, पैसे गेले म्हणून समजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Form 15G And 15H) आजकाल सेविंगच्या हिशोबाने प्रत्येकाचं कोणत्या न कोणत्या बँकेत किमान एक तरी अकाऊंट असतं. त्यात गुंतवणूकदारांचा सर्वाधिक कल FD कडे आहे. त्यामुळे गेल्या काही काळात FD धारकांची संख्या वाढली आहे. जर तुम्हीही FD धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बँकेत एक महत्वाचा फॉर्म भरणे गरजेचे आहे. जो न भरल्यास कदाचित तुमच्या अकाउंटमधील पैसे कापले जाऊ शकतात. या फॉर्मविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घेण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या.

(Form 15G And 15H) कोणत्याही बँकेत मुदत ठेव (FD) असल्यास हा फॉर्म त्वरित भरून बँकेत सबमिट करणे गरजेचे आहे. आता हा फॉर्म नक्की कोणता आहे? आणि इतका गरजेचा का आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

तर खात्यातून पैसे कापले जाणार..

तुम्ही तुमच्या बँकेत एफडी केली असेल तर फॉर्म 15G आणि फॉर्म 15H (Form 15G And 15H) भरून सबमिट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमचा TDS कापला जाऊ शकतो. मुदत ठेव ग्राहकांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी हे फॉर्म सबमिट करावे लागतात. हा फॉर्म भरल्याने व्याजावर TDS कापला जात नाही. फॉर्म 15G अंतर्गत वयवर्षे ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे ग्राहक कर सवलतीचा दावा करू शकतात. तर ज्यांचे वय वर्ष ६० पेक्षा अधिक आहे त्यांना फॉर्म १५ एच वापरून सवलतीचा दावा करता येईल.

15G/H फॉर्म कुणासाठी? (Form 15G And 15H)

ज्या लोकांचं वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली आहे ते ग्राहक फॉर्म १५जी भरू शकतात. हा फॉर्म भरल्यास FD व्याजावरील कर अर्थात TDS कापला जाणार नाही. हा फॉर्म आयकर कायदा 1961च्या कलम 197A अंतर्गत उपलब्ध असून याद्वारे बँकेला तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती मिळते. तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ग्राहकांना करकपातीशिवाय व्याज मिळवायचे असेल तर ग्राहकांनी फॉर्म 15H सबमिट करणे गरजचे आहे. असे केल्यास तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या पैशांवर कोणत्याही कर कपातीशिवाय व्याज मिळेल.

फॉर्म 15G/H सबमिट करणे बंधनकारक आहे का?

मुळात, फॉर्म 15G/H सबमिट करण्याचा कोणताही नियम नाही. (Form 15G And 15H) मात्र, एखाद्या आर्थिक वर्षात तुम्हाला ४० हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर मात्र हा फॉर्म भरणे तुमच्यासाठी गरजेजे ठरेल. अर्थात तुम्ही जर दरवर्षी फॉर्म १५G/H सबमिट केलात तर तुम्हाला टीडीएस भरावा लागणार नाही. म्हणजेच तुम्ही जमा केलेल्या पैशांवर कोणतीही करकपात होणार नाही. साहजिक आहे याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे.