·हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी १८ व्या प्रदर्शनाचे प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते फीत कापून औपचारिक उद्घाटन आज पार पडले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील (दादा), कराड बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण, बाजार समिती संचालक नितीन ढापरे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई , व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील , रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड , शामराव पाटील पतसंस्थेचे चेअमरन बळवंत पाटील, संचालक सतीश इंगवले, राजेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील, संभाजी काकडे, सर्जेराव गुरव, जगन्नाथ लवंड, गणपत पाटील, श्रीमती इंदिरा पाटील, रेखाताई पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला आज शुक्रवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. उद्या शनिवारी (दि. २५) मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन होणार आहे.
https://fb.watch/owo6zlxPvM/?mibextid=Nif5oz
जिल्हा कृषि महोत्सवाचे स्वरुप
कृषी प्रदर्शने महोत्सवातील कृषि प्रदर्शने हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्याची दालने, प्रात्यक्षिके, खादय पदार्थाचे स्ट्रॉल इ. समावेश आहे. कृषि व कृषि पूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन करणेसाठी कृषि व कृषि संलग्न विभागाचा सक्रीय सहभाग राहणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच खाजगी कंपन्या, उदयोजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या याचाही सहभाग आहे.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था
जिल्हयातील शेतक-यांनी उत्पादित केलेल्या/ प्रक्रिया केलेल्या दर्जेदार मालाची विक्री श्रृंखला विकसीत करणेस प्रोत्साहित करावाच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी स्वंतत्र दालन उभारण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, इंद्रायणी तांदूळ, गहू, राळा, नाचणी, वरी, सर्व प्रकारचे कडधान्य तुर, मुग, मसूर, हरभरा, घेवडा, डाळी, शेंगदाणा, भाजीपाला, विदेशी भाजीपाला, आले, फळे पेरू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, प्रक्रिया युक्त पदार्थ – मसाले, हळद पावडर, विविध प्रकारचे लोणचे, सेंद्रिय गुळ, गुळ पावडर, काकवी, मध, आले पाक, आले सरबत, विविध फळांचे जाम, शतावरी पावडर, शतावरी कल्प, नाचणीचे पदार्थ- पापड, सत्व, लाडु, शेवया, राजगिरा लाडू, सोया स्टिक, हर्बल उत्पादने, रेडी टू इट पदार्थ- इडली, विविध प्रकारचे तेल- शेंगदाणा तेल, सुर्यफुल, करडई, लाकडी घाण्यावरचे शेंगतेल इ. शेतमालाचा समावेश आहे.
विक्रेता खरेदीदार संम्मेलन
दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी विक्रेता खरेदीदार सम्मेलन आयोजित केले आहे. यामध्ये प्रक्रियादार, निर्यातदार, घाऊक विक्रेते, ऑनलाईन मार्केटिंग कंपनीचे प्रतिनिधी यांसारखे खरेदीदार व शेतमाल उत्पादित करणारे, प्रक्रिया करणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे लाभार्थी यांचा विक्रेते म्हणून सहभाग असणार आहे. यामध्ये विक्रेता व खरेदीदार यांचेमध्ये सामंजस्य करार होणार आहेत.
शेतकरी सन्मान समारंभ
जिल्हयातील कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
10 लाखांहून अधिक लोक लावतात हजेरी..
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, दिवंगत विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली होती. यंदाचे १८ वे प्रदर्शनस्थळी डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने उत्तम प्रकारे व्यवस्थापन करण्यात आले आहे. दरवर्षी अंदाजे १० लाखांहून अधिक लोक या प्रदर्शनाला हजेरी लावतात. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान या प्रदर्शनात पाहायला मिळते.