माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । आदर्श आचारसंहितेचे जनक व निवडणूक सुधारणांचा प्रारंभ करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेलई नारायण अय्यर (टीएन) शेषन यांचे काल ह्रदयविकारामुळे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या दिड वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.

टी एन सेशन यांच्याबद्दल –
-टीएन शेषन हे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तामिळनाडू केडरचे अधिकारी होते.

-शेषन यांनी 1989 मध्ये अठरावे कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिले होते.

-शासकीय पातळीवरकेलेल्या त्यांच्या सेवांबद्दल त्यांना १९९६ साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कारही मिळाला होता.

-टीएन शेषन हे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते.

-त्यांनी 12 डिसेंबर 1990 रोजी 11 डिसेंबर 1996 पर्यंत काम केले होते.

-आदर्श आचारसंहिता लागू करण्यासाठी ते प्रसिध्द होते.

-आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या राजकरण्यांच्या प्रवृत्ती विरुध्द शेषन यांनी युद्ध पुकारले.

टी.एन. शेषण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील शब्दात शोक व्यक्त केला आहे, “श्री टी.एन. शेषण हे एक उत्कृष्ट नागरी सेवक होते. त्यांनी अत्यंत परिश्रम व अखंडतेने भारताची सेवा केली. निवडणूक सुधारणांच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिक मजबूत आणि सहभागी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती.”




Leave a Comment