व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का : काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पुत्र प्रताप व मानसिंग तसेच पुतण्या सुनील पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे.

आमदार आनंदराव पाटील हे गेली चार दशके काँग्रेसच्या जिल्ह्याच्या राजकारणाची चव्हाण गटाची धुरा संभाळून आहेत आनंदरावांखेरीज चव्हाण गटाच्या राजकारणाचे पानही हलत नसे. मात्र आनंदराव पाटील अलीकडे थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच नाराजी व्यक्त केली होती. सततच्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी पक्ष सोडला आहे.

एकपेक्षा एक निष्ठावंत भाजपमध्ये खेचुन पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आव्हान उभा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डॉ. अतुल देशमुख यांचे पारडे आमदार आनंदराव पाटील यांचे भाजप प्रवेशाने नक्कीच जड झाले आहे. त्यामुळे कराड दक्षिण या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप निवडणुकीची चुरस निर्माण करणार हे मात्र निश्चित.