सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाबळेश्वर भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातीत कर्मचाऱ्यास मोजणीच्या कामावेळी माजी नगरसेवक संजय पिसाळी यांनी मारहाण केली. आज चार दिवस झाले तरी संशयित आरोपीस अटक न झाल्याने भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावुन कामबंद आदोलन सुरु केले आहे. बेदम मारहाणीमुळे जखमी भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातील कर्मचारी रविंद्र फाळके यांच्यावर वाई येथील साई गणेश हॅास्पीटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी रविंद्र फाळके यांनी म्हटले आहे की, तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील सर्वे नंबर 10/3 जमिनीच्या हद्दीच्या खुणा कायम करण्याकरीता दुपारी अडीच वाजता महाबळेश्वर भुमी अभिलेख कार्यालयातून मी रविंद्र फाळके, दिपक मांढरे दोघे मोजणी कामी पोहचलो असताना. राहुल पिसाळ व त्यांचे भाऊ संजय पिसाळ हे सदर ठिकाणी आले व माझ्याकडे पाहुन प्रकरणाचा नकाशा मला दाखवा असे म्हणाले असता. मी नकाशा दाखवला असताना तुम्ही चुकीच्या हद्दी दाखवत असुन खोटे काम करीत आहेत असे संजय पिसाळ म्हणाले. मी त्यांना माझे काम शासकीय नियमाप्रमाणे चालले आहे असे म्हणालो. यावेळी हद्दीचे काम दाखवत असताना त्यांनी मला तु चुकीचे काम करीत आहेस कार्यालयीन वेळेनंतर शासकीय कर्मचारी नसतो. तुला बघतो असे म्हणुन मला शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने माझ्या कानशिलात व डोकेवर मारहाण केली. अधिक तपास पोलीस सब इन्सस्पॅक्टर अब्दुलहादी बिद्री करत आहेत.
संजय पिसाळ याला अटक न झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडणार : सचिन वाघ
याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक संजय पिसाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय महाबळेश्वर सचिन वाघ याच्यासह भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यानी काळी फित लावुन कामबंद आंदोलन केले आहे. कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी नगरसेवक संजय पिसाळ याला अटक न झाल्यास संपुर्ण जिल्हाभर कर्मचारी आदोलन छेडतील, असा इशारा उपअधिक्षक सचिन वाघ यांनी दिला आहे.