भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 1083 च्या विश्वविजेते संघाचा भाग असलेले यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल शर्मा यांचे वय 66 वर्षे होते.

11ऑगस्ट 1954 रोजी लुधियाना येथे जन्मलेल्या क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांनी 1978 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर ते इंग्लंडमध्ये खेळलेल्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होते.

यशपाल शर्मा यांनी भारताकडून एकूण 37 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 34 च्या सरासरीने 1666 धावा केल्या. त्याचवेळी यशपाल शर्माने एकूण 42 एकदिवसीय सामन्यात 883 धावा केल्या. यशपाल शर्मा हा 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होता.