बँक ऑफ महाराष्ट्रातील सव्वा कोटींच्या घोटाळ्याखाली ‘या’ माजी क्रिकेटरच्या वडिलांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बैतूल : वृत्तसंस्था – भारताचा माजी क्रिकेटर नमन ओझाचे वडील विनय ओझा (Vinay Oza) यांना अटक करण्यात आली आहे. बँक मॅनेजर असताना सव्वा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात बैतूल पोलिसांनी विनय ओझा (Vinay Oza) यांना हि अटक केली आहे. 2013 मध्ये बैतूलच्या मुलताई तहसीलच्या जोलखेडा गावात महाराष्ट्र बँक शाखेत विनय ओझा (Vinay Oza) हे कार्यरत असताना हा घोटाळा झाला होता. या गैरव्यवहारात आणखी एक व्यवस्थापक अभिषेक रत्नमचाही सहभाग होता. बैतूल पोलिसांनी विनय ओझा यांना फसवणुकीसह अन्य कलमांत अटक केली होती. या सर्व प्रकारानंतर मुलताई पोलिसांनी विनय ओझा यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विनय ओझाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत 2013 मध्ये सुमारे 1 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी 2014 मध्ये तत्कालीन मॅनेजर विनय ओझा (Vinay Oza) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांच्यावर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा (Vinay Oza) हे फरार झाले होते. पोलीस 8 वर्षांपासून शोध घेत होते. आज पोलिसांनी विनय ओझाला अटक केली आहे.

कोण आहे नमन ओझा?
नमन ओझा हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने 113 आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमन ओझा याची कारकीर्द खूप छोटी राहिली आहे.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Leave a Comment