मॅच फिक्सिंगनंतर सौरव गांगुलीने टीम इंडियाचे चित्रच बदलले – नासिर हुसेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. सन २००० मधील मॅच फिक्सिंग घोटाळ्याने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिमा डागाळली होती, त्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि प्रतिमा सुधारली. त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले.

ज्या पद्धतीने सौरव गांगुलीने स्वतःची टीम तयार केली आणि तरुण खेळाडूंना संगत घेऊन परदेशी भूमीवर झेंडा फडकावला ते कॊतुकास्पद होते. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००२ मध्ये श्रीलंकेबरोबर संयुक्तपणे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती तसेच २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती.

सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाचे आता इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन याने कौतुक केले आहे. नासिर हुसेन यांनी दादाने भारतीय संघाचे चित्र कसे बदलले याबद्दल सांगितले. हुसेन यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी भारतीय संघ सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह एक ‘चांगली टीम’ असायचा, परंतु गांगुलीने या संघाला एक ‘कठीण टीम’ बनवले.

Harsha Bhogle recalls Natwest 2002 final

हर्षा भोगलेबरोबर झालेल्या लाइव सेशनमध्ये बोलताना हुसेन म्हणाला, “सौरव गांगुलीच्या आधी भारत एक चांगला संघ होता. या संघात अझर, जवागल श्रीनाथ सारखे महान खेळाडू होते. पण गांगुलीने या संघाला कठीण संघ बनविला.”त्याचबरोबर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना हुसेन म्हणाला की,’ कोहलीने भारतीय संघाला तंदुरुस्त आणि जिंकण्याची मानसिकता दिली.

Where are they now: India's 2002 Natwest Series final winning team

हुसेन म्हणाला, “रेड बॉल क्रिकेटमध्ये बर्‍याच गोष्टींवर काम करावे लागते. मला वाटते विराट कोहली ज्या पद्धतीने संघ हाताळत आहे, टीममध्ये फिटनेसची संस्कृती तसेच जिंकण्याची मानसिकता सर्व कोहलीमुळेच आहे.”या चॅट दरम्यान हुसेनने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसनला त्याचा आवडता कर्णधार म्हणून निवडले आणि इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गनला व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment