नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी परिषदेत कोरोनाला ”देवाची करणी’ असं म्हटल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर मोठी टीका होतेय. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री सीतारमण यांच्या त्याचं वादग्रस्त विधानावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पी. चिदंबरम यांनी काही सलग ट्विट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारलेत. ‘कोरोना महामारी जर दैवी घटना असेल तर आपण २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० दरम्यान, अर्थव्यवस्थेतील गैरप्रकाराचं वर्णन कसं करणार? आता अर्थमंत्री ‘देवदूत’ (Messenger of god) बनून उत्तर देणार आहेत का? असा सवाल पी. चिदंबरम यांनी ट्विटरवर केलाय.
The two options given by the Modi government to the States to bridge the GST Compensation gap are unacceptable
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) August 29, 2020
गुरुवारी झालेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या बैठकीत सीतारमन यांनी करोनाचा उल्लेख करताना ‘देवाची करणी’ असा केला होता. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगतानाच त्यांनी राज्यांसमोर पैशांसाठी दोन पर्याय ठेवलेत. यातील पहिला पर्याय म्हणजे, आरबीआयशी चर्चा करून राज्यांना योग्य व्याज दरानं ९७ हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून पाच वर्षांत परतफेड केली जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांनी राज्यासमोर ठेवलेला दुसरा पर्याय म्हणजे या पूर्ण वर्षातील जीएसटीच्या परतफेडीतील तफावत आरबीआयचा सल्ला घेऊन उधारीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते.
केंद्र सरकारच्या दोन्ही पर्यायांवर चिदंबरम टिप्पणी करत टीका केली. जीएसटीच्या परताव्यासाठी इतर पर्याय देताना राज्यांना आरबीआयकडून पैसे उधार घेण्यास सांगितलं जातं. ही केवळ सावकारी आहे. फक्त नाव वेगळं आहे. पुन्हा सगळं आर्थिक ओझं राज्यांवरच पडणार आहे. केंद्र सरकार कोणत्याही आर्थिक जबाबदारीतून सरळ-सरळ अंग काढून घेत आहे. हा विश्वासघात आहेच शिवाय कायद्याचं थेट उल्लंघन आहे, अशी टीका पी चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.