गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद प्रतिनिधी । गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी त्यांची तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

केशुभाई पटेल यांची सप्टेंबरमध्ये कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, तसेच ते ह्या संसर्ग आजारातून बरे देखील झाले होते. स्टर्लिंग हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. अक्षय किलेदार यांनी याबाबत सांगितले की, “आम्ही त्यांच्या तब्येतीतील बिघडलेली गुंतागुंत सोडविण्याची पूर्ण प्रयत्न करीत होतो. मात्र त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने सकाळी 11:55 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.” मात्र कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही , हे देखील हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले.

केशुभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी 1995,1998,2001 अशा दरम्यान मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्यानंतर मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे.

केशुभाई पटेल हे सहा वेळा गुजरात विधानसभेवर निवडून गेले होते.  आपल्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटी पटेल यांनी २०१२ मध्ये भाजप सोडून स्वतःचा ‘गुजरात परिवर्तन पक्ष’ स्थापन केला होता.  २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत नवीन पक्ष काहीच कामगिरी करू शकला नाही त्यामुळे नंतर पटेल यांनी 2014 मध्ये हा पक्ष भाजपमध्ये विलीन केले.


Leave a Comment