काँग्रेस नेते बाळासाहेब थोरवे यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरवे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बाळासाहेब थोरवे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे २ वेळा अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते क्लब ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांनी १९८५ मध्ये NSUI चे अध्यक्ष पदसुद्धा भूषविले होते.

बाळासाहेब थोरवे यांनी ७ वर्षे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले होते. बाळासाहेब थोरवे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. बाळासाहेब थोरवे यांचे व्‍यक्तिमत्व सामाजिक जाण असलेले व पक्षावर निष्ठा ठेवणारे होते. तसेच ते पक्ष संघटनेच्या कामात आवर्जून सहभागी होत होते.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. बाळासाहेब थोरवे पुणे शहर काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमविला आहे, असे उद्गार शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काढले आहे.

You might also like