मारुतीचे माजी MD जगदीश खट्टर यांचे निधन, त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मारुती सुझुकीचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांचे सोमवारी 26 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खट्टर हे 1993 ते 2007 पर्यंत मारुती उद्योग लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक होते. 1993 मध्ये त्यांनी मारुती विपणन संचालक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते 1999 मध्ये कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक झाले. या पदासाठी त्यांना नॉमिनी म्हणून सरकारने निवडले. त्यानंतर 2002 मध्ये ते सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे नॉमिनी झाले.

कार्नेशन ऑटो इंडियाची स्थापना
मारुती मधून निवृत्त झाल्यानंतर जगदीश खट्टर यांनी कार्नेशन ऑटो इंडिया (Carnation Auto India) सुरू केली. ही एक ऑटोमोटिव्ह सेल्स अँड सर्व्हिस कंपनी आहे. खट्टर हे 78 वर्षांचे होते. मारुती सुझुकीला येण्यापूर्वी खट्टर हे आयएएस अधिकारी होते ज्यांना 37 वर्षांचा अनुभव होता. 2007 मध्ये मारुती मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कार्नेशन ऑटो इंडिया नावाची एक नवीन कंपनी सुरू केली. हि एक मल्टी ब्रँड पॅन इंडिया सेल्स अँड सर्व्हिस नेटवर्क प्रदान करते.

2019 मध्ये वादात अडकले
खट्टर 2019 मध्ये वादात अडकले होते. जेव्हा सीबीआयने त्यांच्यावर कार्नेशन ऑटो इंडियाच्या माध्यमातून 110 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला. सीबीआयने खट्टर आणि त्यांच्या कंपनीविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. 7 ऑक्टोबर 2019 रोजी पंजाब नॅशनल बँकेनेही खट्टर विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर खट्टर यांनी या आरोपपत्रांच्या विरोधात म्हटले होते की,”कंपनीने कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. या वर्षाच्या सुरूवातीस, स्वतंत्र लेखा परीक्षकांनी कार्नेशनच्या बॅलन्सशीटचे सविस्तर फॉरेन्सिक ऑडिट केले ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही गडबड आढळली नाही.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment