महाबळेश्वर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांच्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरून अडचणीत आलेल्या आहेत. माजी नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना दिले होते. जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाधिकारी सातारा याच्यातर्फे नगरविकास खात्याला याबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यामुळे महाबळेश्वर पालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच अमिता दगडे- पाटील व स्वप्नाली शिंदे याच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहील्याने खळबळ उडाली आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेच्या भ्रष्ट्राचाराबात सातारा जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी स्वच्छता अभियानात करोडो रुपयाच्या टेडर मध्ये कोणतीही कायदेशीर पद्धतीचा अंवलंब न करता, तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना टेडर दिली असल्याचा आरोप करण्यात केला आहे. स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करुन मनमानी अवास्तव रक्कम लावून टेडर काढली. कचरा डेपो, रंगरंगोटी घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी, लेन्स कॅमेरे खरेदी ,स्वच्छता अभियानात अडव्हरटायजिंग करीता दिलेले टेडरमध्ये घोटाळा केला असल्याचे म्हटले आहे. यतिराज बांधकाम कंपनीच्या बाधकाम ठेक्याबाबत स्वच्छता जनजागृती करीता वापलेल्या सामग्रमध्ये नियमबाह्यता, सोशल मिडीया जनजागृतीमध्ये अवास्तव व भरमसाठ बिलाची केलेली वाढ, बोगस कर्मचारी दाखवुन बिल काढून कोटी रुपायचा चुना नगरपालिकेला लावला असल्याची तक्रार युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे यांनी केली होती.

दरम्यान जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव यांना पाठवलेल्या अहवालात अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात फार गंभीर बाबी नमुद केल्या आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेने खरेदी केलेल्या मशनरी व साहीत्य खरेदी नियमबाह्य व आर्थिक देयके देताना नियमबाह्यता असल्याचा ठपका चैाकशी अहवालात अधिकारी यांनी ठेवला आहे. मलनिस्सारण केद्राच्या देखभाल दुरुस्तीचा निविदेमध्ये घोळ, नगरपालिकेचे नुकसान करुन प्रदुषण कर व प्रवासी कराचा नियमबाह्य ठेका, यतिराज कंपनीला रंगरंगवटी साठी दिलेला ठेका व यतिराज कंपनीने काढलेली नियमबाह्य बिले अशा विविध मुद्द्यांवर चैाकशी अहवालात भ्रष्ट्राचार असल्याचा ठपका चैाकशी अधिकारी यांनी चाैकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान राज्याचे माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळत आहेत. माजी नगराध्याक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावरील भ्रष्ट्राचाराची पोलखोल नगरविकास खात्याकडे दाखल अहवालात चैाकशी अधिकाऱ्याकडून स्पष्ट झाले आहे. याबाबत शिंदे सरकार काय भूमीका महाबळेश्वर नगरपालीकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घेणार याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

Leave a Comment