सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
“रहिमतपूर शहरात अनेक ठिकाणी चुकीची कामे झाली आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावरील अडचणी पहिल्यांदा काढाव्यात. सर्वांना समान न्याय मिळावा. गावातील इतर रस्ते व गटर नियमाप्रमाणे करा, त्यानंतर आमच्याकडे या. अन्यथा एक इंचही वाढीव जमीन देणार नाही,” असा थेट इशारा रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी दिला.
रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्यासह ॲड. अधिराज माने , रोकडेश्वर गल्लीतील बहुसंख्य नागरिकांच्यावतीने रहिमतपूर नगरपालिका स्थापत्य अभियंता विनोद दहिफळे व नगर अभियंता शरद बर्डे यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी वासुदेव माने यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले की, आमचा विरोध डावलून रहिमतपूर येथील रस्ते व गटारांची कामे सुरू केल्यास संपूर्ण गावातून उठाव केला जाईल. प्रसंगी उपोषणास बसण्याशी आम्ही सर्व नागरिक मागे पुढे पाहणार नाही.
…अन्यथा एक इंचही जमीन देणार नाही; माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांचा इशारा
रहिमतपूर येथील रस्ते-नालेप्रश्नी नागरिक आक्रमक : पालिका प्रशासनास आंदोलनाचा इशारा pic.twitter.com/fFtC55CXKd
— santosh gurav (@santosh29590931) March 15, 2023
यावेळी सुखदेव माने, सोमनाथ बाजारे, प्रल्हाद बाजारे, दिलीप संकपाळ, बाळासाहेब गोरेगावकर, बुरमलशेठ गांधी, भरत शेठ शहा, इमरान जमादार, सादिक आतार सर, विनोद खान डांगे, विवेक पवार, गणेश जानकर, जालिंदर भोईटे, दीपक राव माने, विशाल कारंजकर, तानाजी निकम, विशाल माळी, राजेश सराटे, शशिकांत देगावकर, सुनील बूक्कम, रोकडेश्वर गल्लीतील नागरिकासह रहिमतपूर शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.