मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा; सदाभाऊंची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह अधिवेशनात अनुपस्थितीत राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज निशाणा साधला. “सत्तेवर आल्यापासून दोन वर्षाच्या काळात आघाडी सरकारने एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना. आणि त्याचबरोबर आता एक नवीन योजना गावोगावी सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा, असे म्हणत खोत यांनी टीका केली.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी त्यांनी आघाडी सरकार व मुख्यमंत्री युद्ध ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, आज ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मी मटका, गुटखा या चिठ्या सभागृहात दाखवल्या आहे. तरीही राज्य सरकारचे यावर लक्ष नाही आणि सरकार म्हणते कुठे गुटखा, मटका नाही. खरे म्हणजे कारवायांमध्ये महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारला यातली वसूली असल्याने सरकार कारवाई करत नाही. नुसती बघ्याची भूमिका घेत आहे.

खरे म्हणजे महाविकास आघाडीचे हे सरकार बहिरे आणि लुटमार करणारे सरकार झाले आहे. या सरकारला आता फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यामुळेच आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात गुठखा, मटका याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर या सरकारकडून कारवाई का केली जात नाही? असा सवाल यावेळी खोत यांनी उपस्थित केला आहे.

योद्धा घरातूनच युध्द पाहात आहे – खोत

यावेळी माजी मंत्री खोत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही ट्विट करीत निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबत माहिती देताना म्हंटले होते की, मुख्यमंत्री जिथे आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. राऊतांच्या या स्पष्टीकरणावरून खोत यांनी राऊतांना टोला लगावला. हे तर अस झालं नाही का? योद्धा घरातूनच युध्द पाहात आहे. असे ट्विट खोत यांनी केले आहे.

Leave a Comment