माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । मनसेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर दोन दिवसांपूर्वीच विराजमान झालेल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याने क्रांतीचौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अदालत रोडवर हर्षवर्धन जाधव यांच्या मालकीची जागा आहे. या जागेवर नितीन रतन दाभाडे वय-३० (रा.बनेवाडी) या तरुणाने काही दिवसांपूर्वी एक टपरी उभी केली होती. ती टपरी लावल्याचा कारणावरून हर्षवर्धन जाधव टपरीचालक जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याच फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साह्ययक निरीक्षक देवकर हे करीत आहेत.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.  former-mla-harshavardhan-jadhav-lodged-an-atrocity-offense

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.