माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीत अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणार कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यास दिल्लीत गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून दिल्लीत दाखल झालेल्या काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही आपण आंदोलन करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले होते.

याविषयी अधिक माहिती अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील जंतर मंतर वर आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना आणि इतर कारणे देत दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्या नंतर आंदोलनाबाबत साशंकता निर्माण झाली होती. तरी देखील हर्षवर्धन जाधव यांनीही आंदोलनाला परवानगी नसली तरी आंदोलन करणारच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या नुसार कार्यकर्त्यांसह जाधव दिल्लीत पोहोचले होते.

आंदोलनकर्ते निश्चित स्थळी पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मराठा आणि आरक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. तर या पुढील काळात देखील आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.