ठाकरे गटाला मोठा धक्का!! माजी आमदार राजन साळवी शिवसेनेत जाणार; उद्या होणार पक्षप्रवेश

0
1
Rajan Salvi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महापालिकेच्या निवडणुकींपूर्वी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यामध्ये आता कोकणातून शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण नुकताच ठाकरे गटाचे निष्ठावान आणि माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे याचा फटका ठाकरे गटाला बसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या होत्या. तसेच, त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचेही बोलले जात होते. मधल्या काळात भाजप नेत्यांसोबत त्यांनी काही बैठका घेतल्याचेही वृत्त होते. परंतु, भाजपकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे म्हणजे, राजन साळवी उद्या ठाण्यातील आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ते अधिकृतपणे धनुष्यबाण स्वीकारतील. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का

दरम्यान, राजन साळवी हे कोकणातील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरणार आहे. खरे तर, कोकणात ठाकरे गटाची पाळेमुळे घट्ट असल्याचे मानले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साळवी यांच्या निर्णयाचा परिणाम स्थानिक राजकारणावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्षात बदललेली परिस्थिती, नेतृत्वाबाबत वाढलेली अस्वस्थता आणि भविष्यातील राजकीय गणिते पाहता त्यांनी आता शिंदे गटात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.