राज ठाकरे, तुम्ही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही, आदेश द्यायला; माजी मनसैनिकाची सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यानंतर आता याच भोंग्याच्या मुद्द्यांवरून माजी मनसैनिक तथा प्रहार संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री, पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरावं, असे आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांना मशिंदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः यावं त्यांचा ताफा मी अडवेन. राज ठाकरे हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वतः मैदानात उतरावं, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. प्रहार संघटनेकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1148398299343310/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर काँग्रेस आणि आता भारतीय जनता पक्षाचे बोलके पोपट म्हणून काम करत आहेत. हिंदू मुस्लीम समाजात भांडणे लावल्या मुळे आपल्या आमदारांची संख्या 11 वरून 1 वर आली हे लक्षात ठेवा, आपलं वक्तृत्व चांगलं आहे पण कर्तृत्व नीट ठेवा अस म्हणत अजित कुलकर्णी यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

Leave a Comment