अश्विनी भिडेंची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई ।  मुंबईत करोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोंधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागी नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल यांची बदली झाली असताना आणखी एक नियुक्ती पालिका प्रशासन स्तरावर राज्यशासनाने केली आहे. मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकिय संचालक पदावरुन जानेवारी महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमण्यात आलं आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते. आज मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचीही बदली झाली. त्याचपाठोपाठ संजीव जैस्वाल आणि अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment