हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. अटल बिहारी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला ग्वालियर येथे झाला त्यांचे वडिल कृष्णा बिहारी वाजपेयी एक महान कवी आणि शाळेत शिक्षक होते. अटलजींनी ग्वालियर च्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पुर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वालियर मधील व्हिक्टोरिया काॅलेज मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.
ग्वालियर येथील आर्य कुमार सभेतुन त्यांनी राजकारणात काम करणे सुरू केले. अटल बिहारींना त्यावेळी आर्य समाजाची युवा शक्ती मानले जात असे. 1944 साली ते त्याचे जनरल सेक्रेटरी देखील बनले. भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी स्वतंत्र भारताच्या राजकारणातील थोर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राजकारणाच्या प्रत्येक काळाला स्पर्श केला आहे.
ठतिहासात एक असा देखील काळ होउन गेला ज्यावेळी वाजपेयी बोलत असत आणि स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू मुग्ध होत त्यांना ऐकत असायचे. एक असा काळ आला ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे विदेश मंत्री बनले, भाजपाचे संसदेतील अस्तित्व जवळ-जवळ नामशेष होत आले होते तेव्हां वाजपेयींच्या नेर्तृत्वात भाजपाचे कमळ देशाच्या सिंहासनावर फडकले. वयाच्या 93 व्या वर्षी 16 आॅगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’