माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची राजकारणात पुन्हा एंट्री! लढवणार राज्यसभा निवडणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बेंगळुरू । माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा वयाच्या ८७ व्या वर्षी ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीयरित्या दिसणार आहेत. पक्षातील आमदार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य नेत्यांच्या आग्रहाखातर ते आगामी राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवाय, त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याचेही दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे सोनिया गांधी यांनी त्यांना सक्रीय राजकारणात पुन्हा पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

उद्या मंगळवारी एचडी देवेगौडा हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात राज्यसभेच्या ४ जागा आहेत. १९ जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ जून आहे. अंदाज वर्तवला जात आहे की, जेडीएसचे सद्याचे खासदार कुपेंद्र रेड्डी हे देवेगौडा यांच्यासाठी आपली जागा सोडू शकतात. तर दुसरीकडे कडे खुद्द सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या असल्याने, कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच देवेगौडा यांना पाठिंबा देणार असल्याच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, काँग्रेस कर्नाटकमधून आपल्या एका उमेदवाराला सहज राज्यसभेत पाठवू शकते. यासाठी अगोदर काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. खर्गे यांना पाठिंब्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांशिवाय अतिरिक्त १४ आमदारांची मत राहणार आहेत. या आमदारांच्या मतांचा वापर काँग्रेस देवेगौडा यांच्यासाठी करू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment