IPL 2021 | …म्हणून हरभजन सिंगने चेन्नई सुपरकिंग्ज संघ सोडण्याची केली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings)

या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबरचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळणे एक उत्तम अनुभव होता. चेन्नईकडून खेळताना अनेक चांगल्या आठवणी आणि मित्र मिळाले. त्यांना मी नेहमीच लक्षात ठेवेन. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ, व्यवस्थापन आणि त्यांच्या चाहत्यांचे मी आभार मानतो, असे हरभजनने सांगितले.

2020 च्या आयपीएल स्पर्धेतून हरभजन सिंगची माघार
हरभजन सिंगने गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. हरभजन हा आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 150 बळी टिपले आहेत. लसिथ मलिंगा (170), अमित मिश्रा (160), पीयूष चावला (156), ड्वेन ब्राव्हो (153) या मोजक्याच गोलंदाजांना अशी कामगिरी जमलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment