भरतगाववाडी येथे 40 फूट खोल विहीरीत पडलेल्या उंद मांजरास जीवदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वनविभाग सातारा यांचेवतीने भरतगाववाडी (ता.सातारा) येथे एका उदमांजरास जीवदान देण्यात आले. भरतगाववाडी येथील अंकुश कणसे यांचे विहिरीत एक उदामांजरास पाण्याचे शोधात विहिरीजवळ आले त्यानंतर पाण्याचे शोधात ते विहिरीत घसरुन खाली पडले. अंकुश कणसे हे विहिरीतून पाणी सोडण्यासाठी गेले असता. खाली उदमांजर हा प्राणी त्यांस आढळून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने वनविभाग सातारा यांना सदर प्राण्याबद्दल माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल कुशल पावरा, वनरक्षक राज मोसलगी, चालक संतोष दळवी, सुमित वाघ, शैलेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन 40 फुट खोल असलेल्या विहिरीतून उदमांजर या प्राण्यास जाळीचे सहाय्याने यशस्वीरित्या बाहेर काढून त्यास नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले.

त्यावेळी मदत कार्यासाठी सुखदेव बर्गे, सुनील ढाणे, तुषार लोहार, अक्षय बर्गे, सुनील बर्गे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहा. वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनपरीक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Comment