मुसळधार पावसामुळे चार एक्सप्रेस रेल्वे चार दिवस रद्द

औरंगाबाद | मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून कासारा घाटात दरड कोसळ झाली आहे. तसेच काही ठिकाणी रेल्वे रूळावर पाणी साचण्यासह काही ठिकाणी रेल्वे रूळ वाहून गेले. त्यामुळे चार एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

यात मुंबई अलीदाबाद – नंदिग्राम एक्सप्रेस 24, 25, 26 आणि 27 तर आलीदाबाद मुंबई 25, 26, 27आणि 28 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस 24, 25, 26 आणि 27 जुलै तर मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस 25, 26, 27 आणि 28 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

तसेच पनवेल- नांदेड विशेष रेल्वे 25 ,26, 27आणि 28 जुलै आणि नांदेड -पनवेल 24 25 26 आणि 27 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस 24 25 26 आणि 27 जुलै तर मुंबई -नांदेड तपोवन 25, 26, 27, 28 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून मिळाली आहे.

You might also like