छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहिद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर / छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत तर दोन जवान जखमी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जवानांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे.

छत्तीसगड येथे बीएसएफचे जवान शोधमोहिमेवर होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला यात चार जवान शाहिद आणि दोन जखमी झाले आहेत. शोधमोहिमेवर असताना जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला त्यांना प्रतिउत्तर देताना ही चकमक उडाली.

जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला त्यांना प्रतिउत्तर फेण्यासाठी जावांनाही प्रतिउत्तर देण्यासाठी गोळीबार केला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. कांकेर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

इतर महत्वाचे –

ब्रेकिंग : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नीने केला उमेदवारी अर्ज दाखल

चारित्र्यावरील संशयातून खूनी हल्ला करणाऱ्या पतीला सक्त मजुरीची शिक्षा

सांगली : अपघातात लष्करी जवानांचा मृत्यू

Leave a Comment