तलावात कार बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या जडगाव येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने गावाशेजारील कोल्हापुरी बंधार्‍यात कार बुडुन एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जडगाव येथील कोल्हापुरी बंधार्‍यात घडली. दरम्यान, पाच वाजेपर्यंत ही कार पाण्याबाहेर काढण्यात यश आले नव्हते.

मुळ सेलुद चारठा (ता.औरंगाबाद) येथील चौधरी कुटुंब हल्ली औरंगाबाद शहरातील गजानन नगर येथे वास्तव्यास आहे. जडगाव येथील वाघ कुटुंबाकडे ते भेटीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान, कार व मृतदेह बाहेर काढल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी काही क्षणात आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेंद्रा एमआयडीसीतील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

तथापि, या पथकाकडे अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने व बंधार्‍याचे मागील तीन महिन्यांपूर्वी मोठी खोलीकरण करण्यात आल्याने शोधकाऱ्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सुमारे चाळीस फुट खोली असलेल्या पाण्यात ही कार गेली आहे. जडगाव ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू असुन घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत ही कार व कुठलाही मृतदेह वर काढल्या गेला नव्हता.

Leave a Comment