4 शिपायांचा शाॅक लागून जागीच मृत्यू; काॅलेजला रंगरंगोटी करताना शिडी घसरली अन्..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. अमरावती शहरालगत कठोरा परिसरात असणाऱ्या पोटे महाविद्यालयात ही घटना घडली. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला असून अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले आहे. चारही मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, रंगरंगोटीसाठी काॅलज प्रशासनाने कॉलेजमधील शिपायांनाच कामाला लावले होते. यावेळी प्रवेशद्वाराच्या इथे रंग देण्यासाठी उंच शिडी उभारण्यात आली होती. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्वजण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का शिडीला लागला. यामुळे झालेल्या अपघातात चौघांनाही वीजेचा शाॅक लागला.

वीजेचा शाॅक इतका जोरदार होता की यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकजणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेत अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45) आणि गोकुळ वाघ (वय 29) असे चौघेजण वीजेचा शाॅक लागून मृत्यू झाले आहेत. ते चौघेही याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते.

कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी लावल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच काॅलेज प्रशासनावरही नागरिकांकडून जबाबदार धरलं जात आहे.

Leave a Comment