शहर व परिसरात दोन महिलांसह चार जणांनी संपविले ‘जीवन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तब्बल चार जणांनी आत्महत्या केल्याचा घटना गुरुवारी उघडकीस आल्या असून, यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या घटनेत, ताराबाई कल्याण शेळके (वय ४०, रा.माळीवाडा, फत्तेबाद, ता.गंगापूर) यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तापस पोलिस नाईक राजेंद्र सोनवणे करीत आहेत. ताराबाई यांना दोन मुले व एक मुलगी आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पती व मुलावर कर्ज आहे. मुलीचे लग्न करायचे कसे, या तणावात त्या होत्या, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत घरगुती कारणातून तनवीर रफीक शेख (वय २८, रा. सादात नगर, रेल्वे स्टेशन) हिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तन्वीर ने छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. या घटनेची सातारा पोलिसांनी नोंद घेतली. तपास जमादार नारायण भागवत करीत आहेत. या प्रकरणात घातपाताचा संशयही व्यक्त करण्यात येतो. तर तिसरी घटना नारेगावात घडली. रणधीर छगन साळवे (वय ५०, रा. गल्ली नंबर ३, नारेगाव) यांनी घरी साडीच्या पल्लु बांधुन गळफास घेतला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ८ वाजता घडली. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात या आत्महत्येची नोंद करण्यात आली.

चौथ्या घटनेत इस्लामपूरवाडी येथील नारायण भानुदास मंदाडे (वय २१) या तरुणाने शेतात विषारी टव प्राशन केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास जहीर शेख करीत आहेत.

Leave a Comment