Wednesday, October 5, 2022

Buy now

शरीराचे भाग तुटले : पुणे- बंगळूर महामर्गावर चारचाकी- पिकअपचा भीषण अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगळूर महामहार्गावर एका पिकअपला चारचाकीगाडीने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झालेला आहे. अपघात एवढा मोठा भयानक होता की मयत व जखमी यांचे शरीराचे काही भाग तुटलेले होते. तर एकाचा पाय तुटून रस्त्याच्यामध्ये पडला होता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहराजवळील महामार्गावर नागेवाडी फाटा येथे आज बुधवार दि. 16 रोजी दुपारी 3. 30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सातारा येथून पुणे बाजूला जाणाऱ्या लेनवरती हा अपघात झाला. पिकअप गाडीचा क्रमांक (एमएच- 12- एसएफ- 5833) टायर पंक्चर झाला होता. पंक्चर काढत असताना पाठीमागून आलेली चारचाकी गाडीने क्रमांक (एमएच- 12- जीव्ही-3515) धडक दिली. चारचाकी गाडीने दिलेली धडक एवढी जोरात होती, की पिकअप गाडीमधील दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. दोघांतील एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे.

सातारा- पुणे महामार्गावर झालेल्या अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झालेले होते. या अपघातनंतर रस्त्यांवर रक्ताचा संडा पडलेला होता. तसेच शरीराचे काही भाग तुटलेले असल्याने अतिशय भयानक चित्र दिसत होते.