कराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड | कराड शहराला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. पूलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून काही दिवसात हलक्या चार चाकी वाहनांसाठी हा पूल सुरु करण्याच्या सूचना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आत्ता पुलावरून दुचाकी वाहने जात आहेत पण काही दिवसानंतर म्हणजे उंचीचे बॅरिकेट टाकल्यानंतर चारचाकी वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात येईल. आणि ही वाहतूक जर सुरू झाली तर हायवे वाहतूकीवरील परिणाम काही प्रमाणात कमी होईल.

कराडच्या जुन्या  पुलावरून चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू होणार | Prithviraj Chavan | Karad

कोल्हापूर नाका येथील ट्राफिक कमी करण्याकरिता या पुलाचा फायदा होईल आणि सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहतूक या पुलावरून होईल. हा पुलाच मजबुतीकरणं झाल्याने या पुलाचा वापर होईल.

राष्ट्रीय महामार्गच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव सुद्धा आहेच पण त्यासाठी 2 वर्ष लागतील तोपर्यंत कराडकरांच्या वाहतुकीची सोय ही जुन्या कोयना पुलाच्या पुनर्जीवनीकरणामुळे होणार आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment