औरंगाबाद: सावधान तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि तुम्ही देखील निष्काळजीपणाने वावरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अंघोळीसाठी बादलीत काढलेल्या गरम पाण्यात पडून भाजलेल्या चारवर्षीय बालकाचा उपचारा दरम्यान घाटी रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. भोईवाडा येथील या ह्रदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भोईवाडा परिसरातील उदय कॉलनीत १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. याविषयी क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात झाली होती जय संजय काळे असे मृत बालकाचे नाव आहे. जय हा १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वाजता घरात खेळत असतांना घरातील मंडळींनी अंघोळीसाठी कळशीतील गरम पाणी बादलीत काढून ठेवले होते. त्या घरातून बाथरूममध्ये परत येईपर्यंत जय पाण्याच्या बादलीत पडला.
भाजल्याने तो जोरजोरात ओरडला नातेवाइकांनी त्याला गंभीर भाजलेल्या अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता वॉर्ड क्रमांक २२ मध्ये उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ३:१५ वाजण्याच्या सुमारास जयचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्हणून घरात लहान मुले असतील तर अजून जास्त काळजी घ्या हा प्रकार आपल्यासोबत घटणार नाही याचं लक्ष ठेवा…!
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group