हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणूक करून घोटाळेबाज लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान करत आहेत. अशातच असे काहीबनावट ॲप्स सापडले आहेत जे लोकांना त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. हाती आलेल्या माहितीनुसार; गेल्या काही महिन्यांत अनेक बनावट कर्ज ॲप्सनी लोकांची फसवणूक केली आहे. त्यांना सहजपणे कर्जाचे आमिष दाखवून सापळ्यात अडकवून फसवणूक केली. हे बनावट लोक ॲप वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील चोरतात, त्यामुळे फसवणुकीचा धोका वाढला आहे. McAfee ने असे 15 बनावट कर्ज ॲप्स ओळखले आहेत, जे लाखो लोकांनी डाउनलोड केले आहेत.
हे 15 लोन ॲप्स अतिशय धोकादायक
मॅकफीच्या अहवालानुसार, 15 बनावट कर्ज ॲप्स सुमारे 8 दशलक्ष म्हणजेच 80 लाख वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहेत. बहुतेक वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरचे आहेत. तथापि, यापैकी काही ॲप्स स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत.
चुकूनही परवानगी देऊ नका
काही ॲप्स अजूनही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये उपलब्ध आहेत. ॲप इंस्टाल झाल्यावर हे बनावट लोक अनेक प्रकारच्या परवानग्या मागतात. यासाठी तुम्हाला मेसेज, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा ॲक्सेस द्यावा लागेल. मात्र अनेकजण विचार न करता त्यासाठी परवानगी देतात. एकदा ॲपला प्रवेश मिळाल्यानंतर, बँकिंगसाठी आवश्यक असलेल्या वन-टाइम पासवर्डसह तुमचा महत्त्वाचा डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो.
ॲप्सची संपूर्ण यादी
- Préstamo Seguro-Rápido, seguro
- Préstamo Rápido-Credit Easy
- ได้บาทง่ายๆ-สินเชื่อด่วน
- RupiahKilat-Dana cair
- ยืมอย่างมีความสุข – เงินกู้
- เงินมีความสุข – สินเชื่อด่วน
- KreditKu-Uang Online
- Dana Kilat-Pinjaman kecil
- Cash Loan-Vay tiền
- RapidFinance
- PrêtPourVous
- Huayna Money
- IPréstamos: Rápido
- ConseguirSol-Dinero Rápido
- ÉcoPrêt Prêt En Ligne