औरंगाबाद : दोन वर्षात रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून पडेगावातील माजी सैनिक कॉलनी व परिसरात राहणारा सात जणांची सुमारे 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.संजय बाळासाहेब ठोंबरे हा अटक असून त्याच्या कुटुंबातील इंदूबाई ठोंबरे, सचिन ठोंबरे,नितीन ठोंबरे अशी इतर आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी रेखा भगवानराव गायकवाड यांनी तक्रार दिली होती की, ठोंबरे हा माजी सैनिक कॉलनीत किराणा दुकान चालवायचा त्यातून त्याची व गायकवाड यांची ओळख झाली. दोन वर्षात दामदुप्पट रक्कम करून देतो, म्हणून त्याने फिर्यादी सुनंदा गजले,मथुरा घुगे, हमीदा पठाण, हरिदास पवार, यांची प्रत्येकी दोन लाख सोळा हजाराची, सुमन घोडके यांची तीन लाख सहा हजार व लता गर्दे यांची एक लाख 80 हजार अशी मिळून 14 लाख 94 हजाराची फसवणूक केली.
फेब्रुवारी 2018 मध्ये ठोंबरे ला दोन लाख 16 हजार रुपये रोख दिले मात्र त्याने कुठलाही पुरावा दिला नाही. ठरल्याप्रमाणे दोन वर्ष झाल्यानंतर दुप्पट रक्कम देण्यास आरोपीने टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींची शोध पोलीस घेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group