हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधार कार्ड (Aadhar Card) धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जूनपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2024 पर्यंतच होते. मात्र आता याचं मुदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामुळे देशातील कोट्यावधी आधार धारकांना दिलासा मिळाला आहे. (Aadhaar Card Update)
या तारखेपर्यंत आधारकार्ड करता येईल अपडेट (Aadhaar Card Update)
UIDAI ने याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून दिली आहे. या माहिती यामध्येच, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे ही मोफत सेवा myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. संबंधित आधार कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा असे म्हणले आहे. यामुळेच आता पुढील तीन महिने वापरकर्त्यांना आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने मोफत अपडेट करून मिळणार आहे. परंतु हेच काम तुम्ही आधार कार्ड केंद्रावर जाऊन केल्यास यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
सध्याच्या घडीला, बँक खाते उघडायचे असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो तसेच सिम कार्ड खरेदी करायचे असले तरी आपल्याला पैशांबरोबर आधार कार्डशी देखील आवश्यकता पडते. आधार कार्ड नसल्यामुळे अनेक सरकारी कामे आपली खोळंबून राहतात. अशावेळी आधार कार्ड अपडेट केले नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळेच सरकारकडूनच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा पुरवली जात आहे. या सेवेचा लाभ तुम्ही 14 जून 2024 पर्यंत घेऊ शकतात. परंतु तेथून पुढे तुम्हाला पैसे देऊन आधार कार्ड अपडेट करावे लागेल.
दरम्यान आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्यासाठी तुम्हाला डेमोग्राफिक डेटा, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती जमा केल्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होण्याची प्रोसेस सुरू होईल. यामुळे तुमची कोणतीही इतर शासकीय कामे खोळंबून राहणार नाहीत. मात्र आधार कार्ड अपडेट न केल्यामुळे याचा तोटा तुम्हाला सहन करावा लागू शकतो.