14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करता येणार आधार कार्ड ; अशा प्रकारे करा प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. आपल्याला कोणतेही सरकारी काम करायचे असेल किंवा इतर कोणतेही काम करायचे असेल, तर आधार कार्ड खूप गरजेचे असते. कारण आधार कार्ड हे आपले ओळखीचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक वेळा आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सांगितले जाते. परंतु जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत मोफत हे आधार कार्ड अपडेट करू शकताम ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी आधार कार्ड बनवले आहे. आणि त्यामध्ये आजपर्यंत कोणतेही अपडेट केलेले नाही. त्यांच्यासाठी अपडेट करणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये तुमचे नाव, फोटो, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांसारख्या गोष्टी अपडेट करता येणार आहेत. तुम्ही जर 14 डिसेंबर पर्यंत हे अपडेट केले तर तुम्हाला मोफत अपडेट करता येईल. परंतु 14 डिसेंबर नंतर तुमच्याकडून यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. आधार कार्ड अपडेट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील करू शकता. तुम्ही घरबसल्या माय आधार पोर्टलवर लॉगिन करून ते आधार कार्ड अपडेट करू शकता. तसेच ऑफलाइन पद्धतीने तुम्ही जवळच्या आधार केंद्र वर जाऊन देखील अपडेट करू शकता. ऑफलाइनमध्ये तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारले जाईल. तुम्ही दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड कसे अपडेट करावे

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला माय आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेटते वेळ द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. आणि ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर येईल तो ओटीपी तिथे टाकावा लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर यामध्ये तुमचे नाव पत्ता फोटो यांसारख्या अपडेटचा पर्याय दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • साईज पर्यंतचा फोटो अपलोड करायचा आहे
  • या ऑनलाइन प्रक्रियेसाठी पैसे देखील आकारले जाणार नाही
  • मला अपडेट रिक्वेस्ट नंबर दिला जाईल या पद्धतीने तुम्ही ट्रॅक करू शकता.

ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड कसे अपडेट करावे?

  • यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.
  • तिथे गेल्यानंतर तुम्ही आधार सेंटरवर एक फॉर्म भरावा लागेल.
  • आणि आधार नंबर आणि तुमची वैयक्तिक माहिती द्या.
  • यासाठी तुमच्याकडून 50 रुपये शुल्क आकारले जाईल