मराठा विद्यार्थ्यांना ‘सारथी’ तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राजपत्रित) गट-ब पदासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

त्या संबंधीची जाहिरात सारखी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सारखीच व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. मराठा समाजातील अनेक होतकरू तसेच हुशार विद्यार्थी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे राज्य सेवेत आपले भवितव्य घडवू शकत नाहीत.

त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य सेवा क्षेत्रात सक्षम उच्च शिक्षित अधिकारी घडविण्याकरिता, सारथी मार्फत एमपीएससी गट ब ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://sarthi-maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment