औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने गरजू लोकांसाठी शिवभोजन योजना सुरू केली आहे. संचारबंदीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही थाळी मोफत देण्याचे जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते घाटी रुग्णालयात मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य गरजवंतांनी या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
यावेळी मंजूर थाळीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असून याबाबत प्रशासनाने याकाळात शिवभोजन केंद्रांना सहकार्य करण्याची सूचना यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. उद्धव खैरे, शिवभोजन केंद्राचे संजय भैरव, राजू भैरव स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमावेळी माजी खासदार खैरे यांनी कोरोना काळात शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरीब व कष्टकरी लोकांना या शिवभोजन थाळीचा नक्कीच लाभ होणार असून सरकारने सुरु केलेल्या या योजनेचा गरजवंतांना निश्तिच लाभ होणार असल्याचे विषद केले