Free Toll To Electric Vehicles : आता 100 टक्के टोल माफी; सरकारची सर्वात मोठी घोषणा

Free Toll To Electric Vehicles
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Free Toll To Electric Vehicles । महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२५’ अंतर्गत राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना १००% टोलमाफी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना म्हंटल कि, सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक गाड्यांना चालना मिळेल आणि पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होईल. या योजनेत M2, M3 आणि M6 श्रेणीतील चारचाकी इलेक्ट्रिक वाहने, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना टोल भरण्याची गरज राहणार नाही.

पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि ग्राहकांचा खर्च वाचावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामूळेच आता प्रमुख महामार्गावर इलेक्ट्रिक गाडयांना टोल मधून १०० टक्के सूट दिली आहे. यामध्ये या निर्णयामुळे मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावरून प्रवास करताना इलेक्ट्रिक गाड्यांकडून कोणताही प्रकारचा टोल (Free Toll To Electric Vehicles) आकारला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या पैशाची मोठी बचत होईल. आधीच इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचतोय….,. आता सरकारने इलेक्ट्रिक गाडयांना टोल माफी केल्यामुळे आणखी पैसे वाचणार आहेत. म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक वाहनधारकांना डबल फायदा होणार आहे.

कोणत्या इलेक्ट्रिक गाडयांना टोलमाफी – Free Toll To Electric Vehicles

महाराष्ट्र EV पॉलिसी २०२५ अंतर्गत टोलमाफी फक्त विशिष्ट श्रेणीच्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू आहे. यात M2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा (जसे की टाटा नेक्सॉन EV, MG ZS EV, महिंद्रा XUV400 सारखी पॅसेंजर EVs) आणि इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या EVs बसेसमध्येही ही माफी लागू होईल. मात्र, ही वाहने महाराष्ट्रात नोंदणीकृत असावीत आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक असावीत. सध्या फक्त मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक गाडयांना टोलमाफी आहे. इतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना ५०% टोल सवलत मिळेल. ही पॉलिसी २०३० पर्यंत लागू राहील. त्यासाठी सरकारने १,९९३ कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.