आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तब्बल 1356 आजारांवर मिळणार मोफत उपचार ; या व्यक्तींना होणार लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारमार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून देखील अनेक योजना राबवल्या जातात. याआधी आयुष्मान भारत योजना अमलात आणली आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील अमलात आणली आहे. परंतु आता आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जाणार आहे. आणि यातून अनेक कुटुंबांना फायदा मिळणार आहे.

या एकत्रितपणे राबविलेल्या योजनेचा प्रत्येक कुटुंबातील रुग्णास फायदा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 1356 हजारांवर तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहे. घरात जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. देशातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अनेक योजना आणत असतात. यातीलच ही योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा. तसेच त्यांना मोफत आरोग्य उपचार मिळावेत. या हेतूने ही आयुष्मान भारत योजना सुरू केलेली आहे. परंतु या वर्षी सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. ज्या व्यक्तींकडे पिवळे, केशरी, शुभ्र रेशन कार्ड आहे. त्या व्यक्ती आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील 52 रुग्णालयात मोफत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील ऑनलाइन सेवा केंद्रातून आयुष्मान कार्ड काढून घेऊ शकता. त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये आपण जर पाहिले, तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात गेल्या वर्षभरात 1000 पेक्षा जास्त रुग्णांनी मोफत उपचार घेतलेला आहे. या योजनेमुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत नाही. तसेच त्यांची बचत देखील होते.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 82 गावांमध्ये आरोग्य केंद्र आहेत, तर 431 गावांमध्ये उपकेंद्र देखील राबवण्यात आलेली आहे. याशिवाय 12 दवाखाने आहेत. आपले सरकार हे नेहमीच राज्यातील जनतेला प्राधान्य देतात. त्यातही जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळावी. तसेच शिक्षण मिळावे. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न सरकार नेहमीच करत आहे. आता सरकारने महात्मा ज्योतिबा जेव्हा आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्रितपणे केल्याने या योजनेचा अनेक लोकांना फायदा होणार आहे.